
बीड, 4 डिसेंबर (हिं.स.) - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीवर छेडछाड व अत्याचाराच्या प्रयत्नाचा प्रकार बीडमध्ये घडला. हा प्रकार चालत्या ऑटो रिक्षामध्ये घडला असून ही विद्यार्थिनी क्लास मधून घराकडे जात असताना एक अनोळखी व्यक्ती रिक्षात बसला व विद्यार्थिनीचा घर सोडून तिसऱ्या च रोडवर घेऊन निघाला. तिने चालकाला विचारले इकडे कुठे घेऊन जात आहात तर तो म्हणला तो बसलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी जात आहोत. एका अनोळखी ठिकाणी नेऊन मुलीचे तोंड स्कार्फने गुंडाळले आणि तोंड दाबले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीने तीव्र आवाजाने ओरडून विरोध केल्यावर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या गंभीर प्रकरण व गुन्ह्याचे तरुणीने पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड येथे तक्रार दिली व गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis