मूर्तिजापूर तालुक्यात शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
अकोला, 4 डिसेंबर (हिं.स.)। अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील एका शेतकरी पुत्राने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळ-हळ व्यक्त होत आहे. दिपक कुलदीप येरडावकर असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. ताल
प


अकोला, 4 डिसेंबर (हिं.स.)।

अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील एका शेतकरी पुत्राने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळ-हळ व्यक्त होत आहे. दिपक कुलदीप येरडावकर असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे सततची नापिकी, नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळून मूर्तिजापूर शहरातील सोनोरी रोड वरील राहणाऱ्या कुलदीप शंकरराव येरडावकर यांच्या लहाण्या मुलाने शेतात गळफास लावून आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना आज उघडकीस आली. दिपक कुलदीप येरडावकर असे आत्महत्या करणाऱ्या युवकांचे नाव असून तो २० वर्षाचा होता. आपल्या वडिलांसोबत शेतीला हातभार लावणाऱ्या पुत्रानेच जिवन संपवल्याने वडील कुलदीप खचून गेले आहे.

कुलदीप येरडावकर यांच्या कडे ८ एक्कर शेत असून त्यांच्यावर बँक ऑफ इंडिया चे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्जाच्या डोंगरामुळे कुलदीप हाताश झाला होता. परिस्थितीत बदल होत नसल्याने त्याने अखेर आपली जीवनयात्रा संपविली.

त्याच्या जाण्याने शहरात हळ-हळ व्यक्त केल्याजात आहे, तर त्याच्या पच्छात आई, वडील व मोठा भाऊ असा आप्तपरिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande