
अकोला, 4 डिसेंबर (हिं.स.)।
शासकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय तसेच सिटी सुपर हॉस्पिटल परिसराची पाहणी करून विकास कामावर चर्चा करूनसुपर स्पेशालिटी , मॅन पॉवर,मशिनरी या विषयावर चर्चा आमदार रणधीर सावरकर यांनी करून प्रशासनाच्या अडचणी रुग्णांच्या भावना तसेच त्या भागातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून राज्यस्तरावर असलेले प्रश्न जाणून घेतले.
केवळ विरोधासाठी विरोध न करता शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे हॉस्पिटल खाजगीकरण होत नसताना केवळ स्टंटबाजी करण्याचा प्रकार जिल्ह्यात झाला परंतु सर्वसामान्यांच्या पाठीशी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकार कटीबद्ध असून देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत असून आज अचानकपणे आमदार सावरकर यांनी हॉस्पिटलची पाहणी केलीसुपर स्पेशालिटी , मॅन पॉवर,मशिनरी या विषयावर चर्चा कॅथ लॅब,रिक्त जागा भरणे, उपकरणे,न्यूरो सर्जरी चे उपकरणे,पदे भरणी,व्हेंटिलेटर चे उपकरणे, या संदर्भात माहिती घेतली तसेच रुग्णांना होणारा त्रास याबद्दल माहिती घेतली.
आठ डिसेंबर पासून अधिवेशन सुरू असून शासनाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात सगळ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या प्रशासन आणि रुग्ण यांच्या मधात आणि असलेल्या सुविधा याबद्दल जाणून घेतल्या अधिकाऱ्यांची असलेली सुविधांमध्ये गैरसोय प्रकार सहन केल्या जाणार नाही असेही त्यांनी दिले.
यावेळी कॉलेजची डी नडॉ.संजय सोनूने अधिष्ठाता
डॉ.तळोकार,डॉ. अनुप केला ,डॉ.
अरविंद आडे,डॉ.श्यामकुमार शिरसान,डॉ.दिलीप सराटे, डॉ.गणेश बोइनोल, डॉ.महाकोलीवालडॉ.गणेश राठोड डॉक्टरांची संवाद केलाशासकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय पाहणी, विकास कामावर चर्चा,आढावा बैठक बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्याडॉ. एम.डी.अष्टपुत्रे यांच्याकडूनप्लास्टिक सर्जरी करिता उपकरणे.रेडिओ लॉजी शिफ्टिंग या विषयावर चर्चा विनिमय करून शासनाकडे असलेले प्रश्न व पाठपुरावा संदर्भात आणि अडचणी संदर्भात आरोग्य सचिवाशी आरोग्य संचालकाशी संवाद साधला तसेच अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये पाच जिल्ह्यातील रुग्ण येत असून त्या रुग्णांना गैरसोय होता कामा नये तसेच कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा प्रकार कोणी करत असेल तोही सहन केल्या जाणार नाही असाही त्यांनी सांगितले.
रुग्णांची मानवता या नात्याने ईश्वर सेवा समजून कार्य सेवा करा त्यांना मदत करा अशी त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे