अमरावती रेल्वे पूल बंद; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.)शहरातील तीन प्रमुख रस्त्यांना जोडणारा जुना पक्क्या रेल्वेवरील पूल अचानक बंद करण्याच्या निर्णयाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. जवळपास ५० वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल आजही भक्कम स्थितीत असून, वाढती वाहतूक सह
अमरावती रेल्वे पूल बंद; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त, नाराजीचा उडणार भडका


अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.)शहरातील तीन प्रमुख रस्त्यांना जोडणारा जुना पक्क्या रेल्वेवरील पूल अचानक बंद करण्याच्या निर्णयाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. जवळपास ५० वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल आजही भक्कम स्थितीत असून, वाढती वाहतूक सहज पेलण्याची क्षमता त्यात असल्याचा दावा करित माजी नगरसेवक प्रदिप बाजड त्यांनी त्यावरून हलकी वाहतूक सुरू करण्याची नागणी केली आहे.

पूलाचा एकही भाग ढासळलेला नसताना केवळ एका खाजगी तांत्रिक अहवालाच्या आधारे वाहतूक बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, पर्यायी मार्ग उपलब्ध न करता मध्यवर्ती भागातील हा महत्त्वाचा मार्ग बंद केल्याने शहराची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, परतवाडा-धारणी मार्गावरील १५० वर्षे जुने व वास्तविक धोकादायक ठरत असलेले पूल, तसेच अमरावती वलगाव रोडवरील केवळ १४ वर्षांपूर्वी बांधलेला पण निकृष्ट दर्जामुळे अरुंद व अपघातप्रवण झालेला नरखेड रेल्वे पूल - या सर्वांची स्ट्रक्चरल ऑडिट न घेता त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचीही टीका त्यांनी केली.

धोकादायक पुलांकडे दुर्लक्ष करून चांगल्या स्थितीतील पूल बंद करण्यामागे संशय निर्माण होत असून, या निर्णयामुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत आहे. शहरातील जुन्या पुलांचे अहवाल किती मागवले, किती मिळाले व किती पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले, याची माहिती जाहीर करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत किंवा नवीन पुलाला मंजुरी व वर्क ऑर्डर मिळेपर्यंत सदर पुलावरील आडवी भिंत काढून हलक्या वाहनांची वाहतूक तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रदीप बाजड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande