
सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।राज्य निवडणूक आयोगाने अनगर व मंगळवेढा यांसह स्थगित करण्यात आलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन मागे घेण्याच्या टप्प्यापासून पुढील प्रक्रिया पार पडणार असून, नवीन उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त योगेश डोके यांनी दिली.
अपीलमुळे निवडणुका स्थगितनामनिर्देशन छाननीनंतर काही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील केले. त्यात — • अध्यक्ष पदासाठी अपील • मंगळवेढा नगरपरिषद • अनगर नगरपंचायत • नगरसेवक पदासाठी अपील • मैंदर्गी – 1 जागा • सांगोला – 2 जागा • मोहोळ – 2 जागा • मंगळवेढा – 1 जागा • बार्शी – 1 जागा • पंढरपूर – 1 जागाया अपिलांचा निकाल 22 नोव्हेंबरपर्यंत न मिळाल्याने आयोगाने 29 नोव्हेंबर रोजीच्या आदेशाने संबंधित जागांची निवडणूक स्थगित केली. मंगळवेढा व अनगर येथे अध्यक्ष पदाशी संबंधित अपील असल्याने पूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच स्थगिती देण्यात आली होती, असे डोके यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड