
रत्नागिरी, 4 डिसेंबर, (हिं. स.) : सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ व ध्वजदिन 2024 चे उत्कृष्ट संकलन करणाऱ्या संस्था/कार्यालये यांचा बक्षीस वितरण समारंभ येत्या मंगळवारी, दि. 9 डिसेंबर रोजी होणार आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, एअर मार्शल (निवृत्त) एच. एन. भागवत, शिक्षणाधिकारी किरण लोहार, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र अजिंक्य आजगेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी