चंद्रपूरात भाजपच्या माजी नगरसेवकाकडे १२०० मतदारांची यादी, उबाठाची माहिती
चंद्रपूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। येथील दे.गो. तुकूम परिसरातील प्रभाग क्र. १ मध्ये अनेकांची नावे गहाळ झाली असून काही मृत व्यक्तींचीही नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच नविन प्रकाशित मतदार यादीप्रमाणे ९५६ दुबार मते आहेत. याबाबत बीएलओ यांन
चंद्रपूरात भाजपच्या माजी नगरसेवकाकडे १२०० मतदारांची यादी, उबाठाची माहिती


चंद्रपूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।

येथील दे.गो. तुकूम परिसरातील प्रभाग क्र. १ मध्ये अनेकांची नावे गहाळ झाली असून काही मृत व्यक्तींचीही नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच नविन प्रकाशित मतदार यादीप्रमाणे ९५६ दुबार मते आहेत. याबाबत बीएलओ यांना मतदार यादीप्रमाणे घरे तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यांना अर्ध्याअधिक घरांचा पत्ताच मिळाला नाही. तसेच भाजपच्या माजी नगरसेवकाच्या म्हणण्याप्रमाणे याच प्रभागातील तब्बल १२०० नावे दुसरीकडे स्थलांतरित झाल्याने मतदार यादीच्या माध्यमातून त्यांना परत आणण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत महानगरपालिकेला नावांची यादी मागितली असता त्यांनी देण्यास असमर्थता दर्शविली. यावरुन मतदार यादीमध्ये कमालीचा घोळ करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे राहूल विरुटकर यांनी पत्रपरिषदेत केला.

भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव प्रभाग क्र. ५ मध्ये असतांना तसेच प्रभाग क्र. १ मध्ये त्यांची कोणतही स्थावर मालमत्ता नसतांना त्यांच्या कुटूंबाची नावे मात्र प्रभाग क्र. १ मधील मतदार यामध्ये नोंदविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीमधील घोळ निस्तारणे आवश्यक असते. परंतू सदर घोळ अधिक गडद बनत चालला असून विधानसभेत ज्यांनी मतदान केले. त्यातील काही जणांची नावे या मतदार यादीत नाही. अनेक मृत व्यक्तींची नावे या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील घोळ कमी करुन यादी अपडेट करणे गरजेचे असतांना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे यादीची पडताळणी करुन पुन्हा नव्याने यादी तयार करावी व त्यानंतरच निवडणूका घ्याव्या अशी मागणी विरुटकर यांनी पत्रपरिषेत केली. यावेळी जगदिश लोणकर, माजी नगरसेवक सुरेश पचारे व इतरांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande