
धुळे, 4 डिसेंबर, (हिं.स.) - निओरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांटेशन शिरवळ तालुका खंडाळा, जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी आयुर्वेदिक बियाणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचा उद्देश औषधी वनस्पतीचे संवर्धन, बियाणे संकलन, प्रक्रिया आणि घरगुती लागवड याबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. सागर दातीर, सायंटिस्ट नवरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांटेशन सातारा व डॉ. दत्ता ढोले, डॉ. पी आर घोगरे सायन्स कॉलेज, धुळे तसेच संस्थेचे चेअरमन दादासो सुभाष जी देवरे, प्रकल्प समन्वयक श्री एस बी पाटील, समन्वयक श्री नामदेव जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. प्रमुख वक्ते यांनी तुळस, अश्वगंधा, गुळवेल, काळमेघ, आवळा, शतावरी, बेहडा, वासा, भुई आवळी अशा अनेक औषधी वनस्पती त्यांच्या बियाणांच्या वैशिष्ट्ये समजावून सांगितली. बियाणांची निवड, अंकुरण चाचणी, रोपवाटिका तयार करण्याची पद्धत तसेच सेंद्रिय खतांचा वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
-------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर