
नांदेड, 4 डिसेंबर (हिं.स.)।धनमुद्रा अर्बन मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., 1/15/465/ साईसदन शारदानगर नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे.
ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजीनगर दिल्ली-110029 यांनी त्यांचे पत्र दिनांक 6 ऑक्टोबर 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे.
संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकुण 11 संचालक निवडुन द्यावयाचे असुन त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून 8, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून 1 आणि महिला राखीव मतदारसंघातून 2 संचालकाची निवड करावयाची आहे.
सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 8 डिसेंबर 2025 रोजी संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 9 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 15 ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. 20 डिसेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी सकाळी 11 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे.
22 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 27 डिसेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 29 डिसेंबर 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी 29 डिसेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी दु. 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची यादी 31 डिसेंबर 2025 रोजी दु. 5 वा. प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वा. करण्यात येणार आहे. को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांच्याकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे.
धनमुद्रा अर्बन मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., 1/15/465/साईसदन शारदानगर नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन धनमुद्रा अर्बन मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., 1/15/465/साईसदन शारदानगर नांदेडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis