हिंगोली जिल्हाधिका-यांची वरुड चक्रपान व कवठा परिसरात भेट
छत्रपती संभाजीनगर, 4 डिसेंबर (हिं.स.)। हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथे ग्रामपंचायत सभेत उपस्थित राहून नागरिकांना शासनाच्या विविध योजना, अतिवृष्टी अनुदान, ई-केवायसी, सेवादूत अ‍ॅप, आपलेसेवा तक्रार निवा
हिंगोली जिल्हाधिका-यांची वरुड चक्रपान व कवठा परिसरात भेट


छत्रपती संभाजीनगर, 4 डिसेंबर (हिं.स.)। हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथे ग्रामपंचायत सभेत उपस्थित राहून नागरिकांना शासनाच्या विविध योजना, अतिवृष्टी अनुदान, ई-केवायसी, सेवादूत अ‍ॅप, आपलेसेवा तक्रार निवारण प्रणाली आदींबाबत सविस्तर माहिती दिली. शासनाच्या सर्व सेवांचा लाभ जलद, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यावर त्यांनी भर दिला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वरुड चक्रपान येथील जिल्हा परिषद शाळा व आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा) संजय कुलकर्णी, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, तहसीलदार सखाराम मांडवगडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गावात प्लास्टीकमुक्त अभियान राबवण्याचे तसेच 6 व 13 डिसेंबर रोजी शाळा व गाव परिसरात स्वच्छता उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सेनगाव तालुक्यातील कवठा येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्याची पाहणी करून विविध शासकीय सेवा आणि सुविधा नागरिकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचत आहेत की नाही याची माहिती घेतली.

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कृषि योजना, रस्ते, पाणीपुरवठा योजना, घरकुल आवास योजना, नरेगा कामे, पानंद रस्ते, पंतप्रधान आदर्श ग्राम योजना, दलित वस्ती सुधारणा कामे, स्वच्छ भारत अभियान, आदिवासी आश्रमशाळा, समाजकल्याण वसतीगृहे, लपा तलाव, कोल्हापुरी बंधारे, रेशन दुकान तपासणी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, अभा कार्ड, उमेदच्या महिला बचत गटांच्या योजना इत्यादी विविध योजनांची अंमलबजावणी शासन निकषांनुसार होत आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांनी वरुड चक्रपान, कवठा, म्हाळसापूर, भानखेडा, हत्ता आणि साखरा या गावांमध्ये आज संयुक्तपणे तपासणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande