सोयाबीनला हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। नाफेडच्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. या केंद्रावर शेतकऱ्यांना ५३.२८ प्रतिकिलो बाजारभाव मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीन पिकाला योग्य हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राजुर
सोयाबीनला हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा


पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। नाफेडच्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. या केंद्रावर शेतकऱ्यांना ५३.२८ प्रतिकिलो बाजारभाव मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीन पिकाला योग्य हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राजुरीतील होतकरू तरुणांनी एकत्र येत विनयशील कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. या कंपनीस महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाने (नाफेड) मंजुरी दिली आहे. उत्पादनांचे त्वरित वजन, तपासणी आणि शासन निर्देशानुसार देयकाची प्रक्रिया निश्चित वेळेत पूर्ण केली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असून शेती क्षेत्रात अधिक स्थैर्य आणि विश्वास निर्माण होणार आहे.

उद्‌घाटनप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली, शेळके शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी.घंगाळे, उपाध्यक्ष राजेंद्र औटी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कवडे, खरेदी-विक्री संस्थेचे संचालक लक्ष्मण घंगाळे, सहाय्यक कृषी अधिकारी मुकेश महाजन, ग्राम विस्तार अधिकारी संदीप ढोरे, गणेश दूध संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप घंगाळे, वैष्णव धाम फार्मर प्रोड्युसर कंपनीचे दगडू पवार, संजय हाडवळे, धिरज औटी, विक्रम डुंबरे तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande