देशात यंदा ३१५ लाख टन साखर निर्मितीचा अंदाज
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तविलेल्या अंदाजानुसार चालू साखर हंगाम साखर उत्पादनाच्या आणि साखर उताऱ्याच्या दृष्टीने ‘गोड’ ठरणार आहे. देशात गतहंगामापेक्षा ५३ लाख टन जादा म्हणजेच ३१५ लाख टन साखरनिर्मिती होणार आ
साखर


पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)।

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तविलेल्या अंदाजानुसार चालू साखर हंगाम साखर उत्पादनाच्या आणि साखर उताऱ्याच्या दृष्टीने ‘गोड’ ठरणार आहे. देशात गतहंगामापेक्षा ५३ लाख टन जादा म्हणजेच ३१५ लाख टन साखरनिर्मिती होणार आहे. अतिरिक्त साखर गोदामात पडून राहू नये यासाठी एकूण १० लाख टन अतिरिक्त (एकूण २५ लाख टन) साखर निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणी ‘एनएफसीएसएफ’ने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच एमएसपी (किमान साखर दर) वाढेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (एनएफसीएसएफ) देशाचे साखर उत्पादनाचे अंदाज जाहीर केले. मागील हंगामात २६१ लाख टन साखरनिर्मिती झाली होती. चालू हंगामात ३५ लाख टन साखर इथेनॉलनिर्मितीकडे वळविली जाईल. यानंतरही उत्पादन वीस टक्क्यांनी वाढून ३१५ लाख टनांवर पोचेल..सद्यःस्थितीत देशातील तेरा राज्यात आतापर्यंत ४२४ कारखाने सुरू झाले आहे. देशात ४१ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. साखर उतारा आतापर्यंत गतहंगामापेक्षा (८.२९ टक्के) चांगला म्हणजेच ८.५२ टक्के इतका आहे. अनुकूल हवामानामुळे उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांचा उतारा वाढण्याचा ‘ट्रेंड’ दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande