अहिल्यानगर–बीड–परळी नवीन रेल्वे मार्ग : बीड–वडवणी रेल्वे विभागात अंतिम टप्प्यातील काम सुरू
बीड, 4 डिसेंबर (हिं.स.)। अहिल्यानगर–बीड–परळी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यातील बीड–वडवणी रेल्वे विभागात आता अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. मध्य रेल्वेमार्फत येथे इंजिन चाचणी आणि सीआरएस तपासणी होणार आहे. चाचण्यांचे वेळापत्रक इं
अहिल्यानगर–बीड–परळी नवीन रेल्वे मार्गाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट!  बीड–वडवणी रेल्वे विभागात आता अंतिम टप्प्यातील काम सुरू .


बीड, 4 डिसेंबर (हिं.स.)।

अहिल्यानगर–बीड–परळी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यातील बीड–वडवणी रेल्वे विभागात आता अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. मध्य रेल्वेमार्फत येथे इंजिन चाचणी आणि सीआरएस तपासणी होणार आहे.

चाचण्यांचे वेळापत्रक

इंजिन चाचणी – ०६ डिसेंबर २०२५

सीआरएस तपासणी व स्पीड चाचण्या – १० व ११ डिसेंबर २०२५

या काळात सकाळी १० ते संध्या. ६ दरम्यान हाय-स्पीड रन घेण्यात येतील.

बीड जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावयाची काळजी

या चाचण्या सुरक्षित पार पडण्यासाठी आपले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी विनंतीपूर्वक पुढील सूचना पाळाव्यात:

रेल्वे ट्रॅकवर किंवा जवळ अतिक्रमण करू नये, गुरेढोरे ट्रॅकवर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, अनधिकृत ठिकाणी ट्रॅक ओलांडू नये, दिवसभर ट्रॅकपासून सुरक्षित अंतर राखावे

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande