
नाशिक, 4 डिसेंबर (हिं.स.)।
- जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेला गती मिळू लागली असताना, मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे अनेक उमेदवार आणि मतदारांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांमुळे इच्छुकांची संख्या वाढली असून, स्वतःचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी अनेक जण तपासणी करताना दिसत आहेत. मात्र, नवीन नाशिकमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकाराने मतदारांच्या पायाखालची जमीन हादरली आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २७मधून इच्छुक उमेदवार असलेले उत्तम अर्जुन काळे हे मतदान यादीत स्वतःचे नाव तपासण्यासाठी गेले असता, आपले नाव गायब असल्याचे लक्षात आले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नाव यादीत असताना फक्त त्यांचे नाव वगळण्यात आले होते. यामुळे त्यांनी विभागीय कार्यालयात तक्रार दाखल केली.
छाननीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तम अर्जुन काळे यांना मतदार याद्यांमध्ये 'मयत' दाखल करण्यात आले असून, त्यांचे वास्तव्य मतदारसंघ - १२३, मखमलाबाद येथे असल्याचा चुकीचा उल्लेख करण्यात आला होता. परिणामी, प्रत्यक्षात जिवंत असलेले उत्तम काळे हे मतदारसंघ - १२५ मधून नवीन नाशिक २७ या प्रभागात राहून आणि मतदान ओळखपत्र असतानाही मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तम काळे हे सिडको भाजपा मंडल-१ चे उपाध्यक्ष असून, आगामी मनपा निवडणुकीतून उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर झालेल्या या त्रुटीमुळे लोकांमध्ये निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल नाराजी अविश्वास वाढताना दिसत आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कामकाजाला या घटनेने मोठा चाप बसला आहे. आगामी मतदानात आणखी किती जणांना मृत घोषित केले जाईल? हा मोठा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. जिवंत असताना 'मा ठरवणारी ही यंत्रणा, मग साम नागरिकांचा मतदानाचा हक्क वि सुरक्षित ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. संबंधित व्यक्तीच्या नावावर मृत्यू दाखला कसा जोडला गेला, याची तातडीने चौकशी सुरू केली आहे. यात कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दोषी ठरल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV