‘उमीद’ पोर्टलवरील वक्फ मालमत्ता नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी - खा. बजरंग सोनवणे
बीड, 4 डिसेंबर (हिं.स.)। नवी दिल्ली येथे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय अल्पसंख्यक कार्य मंत्री किरण रिजिजूजी यांची भेट घेतली ‘उमीद’ पोर्टलवरील वक्फ मालमत्ता नोंदणीची अंतिम मुदत वाढविण्याबाबत निवेदन सादर केले. गेल्या अनेक दिवसांपासून ‘उमीद’
खासदार  बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय अल्पसंख्यक कार्य मंत्री किरण रिजिजूजी यांची भेट घेतली ‘उमीद’ पोर्टलवरील वक्फ मालमत्ता नोंदणीची अंतिम मुदत वाढविण्याबाबत निवेदन सादर केले.


बीड, 4 डिसेंबर (हिं.स.)।

नवी दिल्ली येथे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय अल्पसंख्यक कार्य मंत्री किरण रिजिजूजी यांची भेट घेतली ‘उमीद’ पोर्टलवरील वक्फ मालमत्ता नोंदणीची अंतिम मुदत वाढविण्याबाबत निवेदन सादर केले.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘उमीद’ पोर्टलवर सतत सर्व्हर डाउन, अपलोड एरर व क्रॅश अशा गंभीर तांत्रिक समस्या येत असल्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वक्फ मालमत्तांच्या नोंदणीचे अपलोड काम ठप्प झाले आहे.

🔹 देशभरात आजपर्यंत फक्त 45,116 मालमत्ताच अपलोड झालेल्या

🔹 मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड मेकर–चेकर–अप्रूवर स्तरांवर अडकलेले

🔹 पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रात हजारो नोंदी अजूनही प्रलंबित

🔹 पोर्टल रात्री काही काळ चालते आणि लगेच क्रॅश होते

या परिस्थितीत 05 डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य असल्याने, अंतिम तारीख वाढविणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी मी माननीय मंत्र्यांकडे केली.

केंद्र सरकार तांत्रिक अडचणींचा विचार करून वक्फ संस्थांना दिलासा देणारा निर्णय घेईल, अशी अपेक्षा खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande