
नांदेड, 4 डिसेंबर (हिं.स.)।
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज संसदेत बिबट्याच्या वाढत्या दहशतीच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.
विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त वावर वाढला आहे यावर त्यांनी संसदेचे लक्ष वेधले. तातडीने बिबट्याला पायबंध घातला पाहिजे अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जंगली जनावरांपैकी विशेषतः बिबट्या वाघ या हिंस्र प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर होत असल्याने शेतकरी,जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या महत्वपूर्ण विषयावर सरकारचे लक्ष वेधून त्यावर चर्चा घडवून आणली.
वनसंपदाच नष्ट होत असल्याने वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे.मुख्यत्वे नांदेड जिल्ह्य़ात वन व सामाजिक वनीकरण विभागातील बहुतांश प्रमाणात दर्जाहिन व कागदोपत्री वृक्षलागवड,संगोपन आदी विविध प्रकारची कामे होत असल्याने तसेच,राखीव वनजमिनी व लगतच्या जमिनीतील गौण खनिज उत्खनन, वाहतुकीसह अन्य कामे आणि वनजमिनीवरील वाढती अतिक्रमणे इ.बाबींमूळे वनसंपदाच नष्ट होत चालल्यानेच मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढल्याचे समजते.
वनविभागाचे कार्यरत उपवनसंरक्षक यांच्या कार्यकाळातच हे प्रमाण वाढल्याचे बोलल्या जाते.
याबाबतही उच्चस्तरीय चौकशीसह दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी समोर येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis