नाशिक : इंजि. हरिभाऊ गीते यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम
इगतपुरी, 4 डिसेंबर (हिं.स.)। नाशिक विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते यांनी कोरोना काळात स्वतः लक्ष घालून धामडकीवाडीतील कुटुंबांपर्यंत आवश्यक मदत पोहोचवली. वाडीवरील लोकांमध्ये असलेले त्यांचे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आजही अविस्म
इंजि. हरिभाऊ गीते यांच्या वाढदिवसानिमित्त धामडकी शाळेत शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम


इगतपुरी, 4 डिसेंबर (हिं.स.)। नाशिक विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते यांनी कोरोना काळात स्वतः लक्ष घालून धामडकीवाडीतील कुटुंबांपर्यंत आवश्यक मदत पोहोचवली. वाडीवरील लोकांमध्ये असलेले त्यांचे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आजही अविस्मरणीय आहे असा सूर इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी धामडकीवाडी येथे उमटला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इंजि. हरिभाऊ गीते यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. पत्रकार भास्कर सोनवणे यांनी ह्या उपक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगिवले म्हणाले की, आमच्या ग्रामस्थांच्या मनात हरिभाऊ गीते यांच्याविषयी विशेष जिव्हाळा आहे. शालेय साहित्य व खाऊचे वाटपाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलले. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत विद्यार्थी व ग्रामस्थांनी हरिभाऊ गीते यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी तर सूत्रसंचालन दत्तू निसरड यांनी केले. ग्रामसेवक रुपाली जाधव, वंदना भगत, चांगुणा आगिवले, बबन आगिवले, लहानू आगिवले, खेमचंद आगिवले यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम भागात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या अशा उपक्रमामुळे शैक्षणिक, सामाजिक भान वृद्धिंगत होत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande