परभणी जिल्हा परिषदेचे अधिकारी दोन दिवस सामूहिक रजेवर
परभणी, 4 डिसेंबर (हिं.स.)। वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गट विकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेविरुद्ध परभणी जिल्हा परिषद अधिकार्‍यांनी निषेध करून आजपासून (दि. 4) दोन दिवस सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली आहे. या अधिकार्‍यांनी आ
परभणी जिल्हा परिषदेचे अधिकारी दोन दिवस सामूहिक रजेवर: वर्धा येथील बीडीओंच्या अटकेचा केला निषेध : जिल्हा परिषद सीईओंना निवेदन


परभणी, 4 डिसेंबर (हिं.स.)। वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गट विकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेविरुद्ध परभणी जिल्हा परिषद अधिकार्‍यांनी निषेध करून आजपासून (दि. 4) दोन दिवस सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली आहे.

या अधिकार्‍यांनी आज गुरूवारी (दि. 4) मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांना या संबंधीचे एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, मंगळवारी (दि. 2) रात्री उशिरा मनरेगा विभागाच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना अटक करण्यात आली. मात्र अटक कारवाईपूर्वी कोणतीही प्राथमिक प्रशासकीय चौकशी न करता, वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी न घेता तातडीने ही पावले उचलली गेली, असा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. महिला अधिकार्‍यांबाबत आवश्यक असलेली प्रक्रिया, कायदेशीर दक्षता आणि संवेदनशीलता पाळली गेली नाही, असे नमूद केले.

या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) डॉ. संदीप घोन्सीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जयंत गाढे, नरेगा गट विकास अधिकारी दत्तात्रेय निलपत्रेवार आणि विविध पंचायत समित्यां मधील गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सामूहिक रजेचा निर्णय घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande