दर्यापूर : ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त
अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.) दोन डिसेंबर रोजी दर्यापूर नगर परिषदेची निवडणूक मोठ्या धुमधडाक्यात पार पडली असून निकाल येत्या 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन पालिकेत सुरक्षित ठिकाणी व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवण
दर्यापूर : ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त


अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.)

दोन डिसेंबर रोजी दर्यापूर नगर परिषदेची निवडणूक मोठ्या धुमधडाक्यात पार पडली असून निकाल येत्या 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन पालिकेत सुरक्षित ठिकाणी व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवण्यात आल्या असून एस आर पी व दर्यापूर येथील पोलीसांचा खडा पहारा 24 तास लागलेला आहे दर्यापूर अमरावती येथील पोलिसांचा पहारा पालिकेत लावण्यात आला आहे कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने ठोस उपाय योजना राबविण्यात आली आहे स्ट्रॉंग रूमच्या आत आणि बाहेरील परिसरात सीसीटीव्हीची निगराणी असणार आहे तर पालिकेमध्ये कुठल्याही अज्ञात व्यक्तींना प्रवेश पूर्णपणे नाकारला आहे यासह प्रवेशद्वारावर सुद्धा सुरक्षा यंत्र बसवण्यात आले आहेत आज पालिकेमध्ये दर्यापूर पोलीस स्टेशनचे एक पोलीस अधिकारी आणि पाच अमलदार तसेच एस आर पी एक अधिकारी आणि आठ अमलदार असा तगडा पोलिसांचा फौज फाटा ईव्हीएम मशीनच्या सुरक्षा दृष्टिकोनातून तैनात करण्यात आलेला आहे शहरात ईव्हीएम मशीन वरून विविध चर्चा पसरल्या जात आहेत 21 तारखेला निकाल असून त्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात अशा अफवांना आता पूर्णपणे विराम लागला गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande