
पुणे, 4 डिसेंबर, (हिं.स.)। पुणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून इच्छुकांचे अर्ज मागवले जात आहेत. मात्र, भाजपकडून अद्यापही इच्छुकांचे अर्ज मागवण्याच्या प्रक्रिये बाबत कोणत्याही हालचाल नाही. त्यामुळे पक्ष निवडणुकीची प्रक्रिया कधी सुरू करणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अशात आता पक्षाच्या वरिष्ठांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या रणनिती, उमेदवारी निवडीच्या प्रक्रियेसाठी तारीख निश्चित केली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडे इच्छुकांची संख्या देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये चार जागांसाठी तब्बल वीस जण इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे .त्यासोबतच पक्षांमध्ये इन्कमिंग करण्यासाठी ही मोठी लाईन भाजपकडे असल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपकडे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आणि पूर्ण तयारी केलेल्यांची संख्या तब्बल 1 हजार इतकी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु