पुणे विभागीय आयुक्तांनी घेतली पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीबाबत बैठक
कोल्हापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाचा भाग म्हणून, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील र
पुणे विभागीय आयुक्तांनी घेतली पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीबाबत बैठक


कोल्हापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाचा भाग म्हणून, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिनांक 01.11.2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीची रीतसर प्रसिद्धी जाहीर केली. तसेच, यादीतील दावे (नवीन नोंदणी) व हरकती दाखल करण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.

मतदार नोंदणीची सद्यस्थिती-

विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी यावेळी माहिती दिली की, 2020 साली झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत सध्या मतदार नोंदणी कमी आहे. तथापि, पुढील कालावधीत निश्चितपणे मागील निवडणुकीपेक्षा मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये वाढ झालेली दिसते.

शिक्षक मतदार संघः 2020 मध्ये 72,190 मतदारांची नोंदणी होती, ती आज प्रारूप यादीच्या प्रसिद्धीच्या दिवशी 44,233 इतकी आहे.

पद‌वीधर मतदार संघः 2020 मध्ये 4,20,896 मतदारांची नोंदणी होती, ती आज 2,72,061 इतकी झाली आहे.

कोल्हापूर- पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- 80,180, शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - 8,631

पुणे- पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- 54,810, शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - 9,778

सांगली- पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- 70,720, शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - 6,134

सातारा - पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- 35,879, शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - 8,492

सोलापूर- पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- 30,472, शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - 11,198

असे एकूण पदवीधर मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी- 2,72,061, शिक्षक मतदार संघासाठी झालेली मतदार नोंदणी - 44,233

दावे व हरकती दाखल करण्याची मुदत - भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, प्रारूप यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत 3 डिसेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे.

कामाचा प्रकार- नवीन नाव नोंदणीचा दावा (पदवीधर), फॉर्म क्र.- 18, मुदत- 3 ते 18 डिसेंबर 2025

नवीन नाव नोंदणीचा दावा (शिक्षक)- फॉर्म क्र.- 19, मुदत- 3 ते 18 डिसेंबर 2025

प्रारूप यादीतील नावांवर आक्षेप- (हरकत)- फॉर्म क्र.- 7, मुदत- 3 ते 18 डिसेंबर 2025

यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती- फॉर्म क्र.- 8, मुदत- 3 ते 18 डिसेंबर 2025

दावे/हरकती सादर करण्याचे ठिकाण: हे दावे/हरकती 18 डिसेंबर 2025 पर्यंत मतदान केंद्रांवर उपस्थित असलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील.

दावे हरकतीचा कालावधी संपल्यानंतर दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी दावे हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्याची कार्यवाही केली जाईल. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी केली जाईल.

राजकीय पक्षांना आवाहन-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्पष्ट केले की, मतदार नोंदणी कार्यक्रम हा सातत्याने चालणारा असला तरी, आगामी काळात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. प्रशासनासोबतच लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने, त्यांनी सर्व राजकीय पक्षांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीची प्रसिद्धी व जागृती करून जास्तीत जास्त पात्र मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्व शासकीय कार्यालये व विभागांनाही तातडीने सहभाग घेण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

विभागीय आयुक्तांनी बैठकीस उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे आभार मानून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. बैठकीसाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तुषार ठोंबरे, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन), पुणे विभाग, पुणे, श्रीमती मिनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे, श्रीमती सुजाता पाटील, तहसिलदार (सामान्य प्रशासन), पुणे हे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande