
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। पुणे शहरातून दौंडकडे जाणारी मुळा-मुठा नदीचे पाणी फेसाळले असून जलपर्णी फोफावली तर फळभाज्या, पालेभाज्या दुषित झाल्याने सर्वसामन्यांचे आरोग्य धोक्यात गेल्याने नदी काठच्या गावात काळजी वाढत असून जनता बेचैन झाली आहे.या प्रदूषणावर उपाय योजना होत नाहीच पण दिवसेंदिवस पाणी आणखी खराब होत असून नदी अतिप्रदुषित झाली आहे. गेल्या काही दिवसापासून येथील विश्वराज बंधा-याजवळ पाण्यावर फेसाचा सुमारे एक ते दीड फूट तवंग तरंगताना दिसून येत आहे.आयुर्वेदात ज्या गावची नदी स्वच्छ त्या गावाचे आरोग्य चांगले असे म्हटले गेले आहे.
मुळा-मुठा नदीही त्याला अपवाद नाही.पानशेत पुरानंतर नदीचे पाणी आसपासच्या भागात कुठवर जाते याची कल्पना आल्यानंतर किमान तो भाग मोकळा करणे हे पुणे महानगरपालिकेला अशक्य नव्हते.न्यायालयाचा आदेश आल्याशिवाय आपल्याकडे शासकीय पातळीवर कोणतेही काम होत नाही हा अनुभव आजच्या स्मार्ट सिटीच्या काळातही प्रत्ययास येतो आहे.कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ या शहराची जीवनवाहिनी नाही तर आरोग्याचे रक्षण करणारी सरिता समजली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु