पुणे पुस्तक महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सवात छायाचित्रकारांसाठी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १४ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयातच छायाचित्र प्रदर्शन
पुणे पुस्तक महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन


पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सवात छायाचित्रकारांसाठी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १४ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयातच छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. यंदा पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यंदा या महोत्सवात एक हजार दालनांचा समावेश असेल. याशिवाय लिस्ट फेस्ट, विविध कार्यशाळा, लहान मुलांसाठी उपक्रम, खाद्य महोत्सव अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

पांडे म्हणाले, ‘‘छायाचित्र प्रदर्शनातून वर्षभरातील घडामोडी, घटना पुन्हा एकदा पाहता येणार आहेत. गेल्यावर्षी पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनातून पुणे पुस्तक महोत्सवाला वेगळा आयाम मिळाला आहे.’’

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande