‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरी २६ डिसेंबरपासून
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. पुण्यासह रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर केंद्रांवर झालेल्या स्पर्धेत प
पुरुषोत्तम करंडक स्पर्धा महाअंतिम फेरी


पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. पुण्यासह रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर केंद्रांवर झालेल्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकांची महाअंतिम फेरी पुण्यात रंगणार आहे. पुणे आणि रत्नागिरी केंद्रांवर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे यंदा कुठल्याही संघाला पारितोषिक मिळाले नसल्याने १८ संघांचे महाअंतिम फेरीत सादरीकरण होणार आहे.महाअंतिम फेरी स्पर्धेचे लॉटस्‌ २५ डिसेंबरला काढण्यात येतील. त्यानंतर २६ आणि २७ डिसेंबरला सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत, तर २८ डिसेंबरला सकाळच्या सत्रात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण २८ डिसेंबरला सायंकाळी करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande