पुणे - राष्ट्रवादीचे नवे ‘शिलेदार’ जाहीर
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरात संघटनात्मक बांधणीस सुरूवात केली आहे. पक्षाने यापूर्वीच शहराध्यक्ष पूर्व आणि शहराध्यक्ष पश्चिम अशी दोन पदे निर्माण करून त्यांची नियुक्ती केली होती. आता शहर (पूर्व)
पुणे - राष्ट्रवादीचे नवे ‘शिलेदार’ जाहीर


पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरात संघटनात्मक बांधणीस सुरूवात केली आहे. पक्षाने यापूर्वीच शहराध्यक्ष पूर्व आणि शहराध्यक्ष पश्चिम अशी दोन पदे निर्माण करून त्यांची नियुक्ती केली होती. आता शहर (पूर्व) विभागाची कार्यकारिणी जाहिर करून त्यात विभागाचे शहराध्यक्ष, माजी आमदार सुनील टिंगरे यांनी जाहीर केले आहे.

कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी ॲड. रूपाली ठोंबरे-पाटील आणि हाजी फिरोज शेख यांची नियुक्ती केली आहे. शहर समन्वयक म्हणून राकेश कामठे यांना जबाबदारी दिली असून प्रसिद्धी प्रमुखपदी बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती केली आहे.पूर्व विभागातील कसबा, वडगावशेरी, शिवाजीनगर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांचीही नियुक्ती झाली आहे.

याशिवाय कार्यकारिणीत ३९ उपाध्यक्ष, २२ सरचिटणीस, १७ चिटणीस आणि २० संघटक सचिव यांची नियुक्ती केली आहे.कसबा विधानसभा मतदारसंघ – अजय दराडे ( अध्यक्ष), राहूल पायगुडे, गोरखनाथ भिकुले ( कार्याध्यक्ष), बाळासाहेब बोडके( निरिक्षक) वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ – सतीश म्हसके ( अध्यक्ष), मिलिंद खांदवे, रमेश पऱ्हाड ( कार्याध्यक्ष), बाळासाहेब कोद्रे

( निरिक्षक) शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ – अभिषेक बोके ( अध्यक्ष), बाळासाहेब आहेर ( कार्याध्यक्ष), नारायण लोणकर ( निरिक्षक) हडसपर विधानसभा मतदारसंघ – शंतनू जगदाळे ( अध्यक्ष), संदीप बधे, अमर तुपे ( कार्याध्यक्ष) विजय ढेरे ( निरिक्षक )

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande