ठाणे शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण सरनाईक यांच्या हस्ते संपन्न
ठाणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओवळा -माजिवडा मतदार संघाचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या
ठाणे


ठाणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओवळा -माजिवडा मतदार संघाचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. यावेळी ठाणे महापालिकेचे अधिकारी व भागातील संदिप डोंगरे, रवि घरत, भगवान देवकाते, हेमंत खांडेकर यांच्या सह माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भरघोस निधीतून ठाणे शहरातील विविध भागात जलतरण तलाव, समाज भवन , स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांचा एकत्रित विकास साधण्यासाठी ८०% समाजकारण व २०% राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याऐवजी वर्षातील ३६५ दिवस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.

जलतरण तलावांचे लोकार्पण

आनंद नगर, ठाणे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे २ जलतरण तलावांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या आधुनिक जलतरण तलाव प्रकल्पाची निर्मिती परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक नागरिक, पदाधिकारी व मान्यवर यांच्या मोठ्या उपस्थित होते.

शहरातील नागरिकांसाठी आरोग्य, क्रीडा व जलतरणाच्या सोयीसुविधा वाढाव्यात या उद्देशाने हे प्रकल्प उभारण्यात आले असून आधुनिक तांत्रिक सुविधा असलेला हे जलतरण तलाव परिसरातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणार आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.

फुटबॉल टर्फची निर्मिती

महापालिका क्षेत्रामध्ये अनेक फुटबॉल प्रेमी असून फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षणासाठी योग्य मैदान व जागा उपलब्ध नसल्याने क्रिडाप्रेमींची प्रचंड कुंचबना होत होती. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी याबाबत केलेल्या मागणीमुळे स्थानिक आमदार व परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मागणी केली.

या ठिकाणी फुटबॉल टर्फ बरोबरच नायलॉन नेट, लँडस्केपिंग, चेंजिंग रूम, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आकर्षक प्रवेशद्वार, इत्यादी ची निर्मिती करण्यात आली आहे.

फुटबॉल खेळत असताना खेळाडूंना इजा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेनुसार उभारण्यात आलेल्या या फुटबॉल टर्फला चारही बाजूंनी लोखंडी जाळी असून पूर्णपणे रबरी सोलींगमुळे (टर्फ) खेळाडूंना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही. त्याचबरोबर मैदानाच्या चोहोबाजूंनी फ्लड लाईटची व्यवस्था असल्याने रात्री १० वाजेपर्यंत सुध्दा या ठिकाणी खेळाडूंना सराव करता येऊ शकेल. प्रत्येक फुटबॉल टर्फच्या ठिकाणी प्रशिक्षित प्रशिक्षकांची सोय असल्याने फुटबॉलच्या नियमावलीनुसार या ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल त्यामुळे ठाणे शहरातून भविष्यामध्ये पेले सारखे जागतिक दर्जाचे फुटबॉल खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

अत्याधुनिक स्मशानभूमी

माजिवडा येथील जुन्या स्मशानभूमीत अनेक गैरसोयी असल्याने अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा मिळण्याकरिता जुन्या झालेल्या सर्व स्मशानभूमींचे अद्ययावत पद्धतीने सुशोभीकरण करून त्यात गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बसविल्या जाव्यात व संपूर्णपणे स्माशानभूमीचे नव्याने सुशोभीकरण व्हावे यासाठी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक प्रयत्नशील होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande