पालघर–ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या संचालकपदी वैभव पाटील यांची निवड
पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)। शिक्षकांच्या न्यायहक्कांसाठी गेली अनेक दशकं सतत लढा देणाऱ्या पालघर–ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या संचालकपदी मेघराज शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यालय, विराथन बुद्रुक येथील वरिष्ठ शिक्षक वैभव पाटील यांची निवड झाली
पालघर–ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या संचालकपदी वैभव पाटील यांची निवड


पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)।

शिक्षकांच्या न्यायहक्कांसाठी गेली अनेक दशकं सतत लढा देणाऱ्या पालघर–ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या संचालकपदी मेघराज शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यालय, विराथन बुद्रुक येथील वरिष्ठ शिक्षक वैभव पाटील यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून शिक्षक व सहकाऱ्यांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संघटनेने भूतकाळात शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून केलेले विविध आंदोलन, धरणे, तसेच बेमुदत उपोषणांद्वारे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. या परंपरेत आता पाटील यांचा अनुभव व नेतृत्वशैलीमुळे नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

वैभव पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील इंडो–नेपाल आंतरराष्ट्रीय शिक्षक श्री पुरस्काराने यापूर्वी गौरविण्यात आले असून सामाजिक क्षेत्रातीलही अनेक सन्मान त्यांच्या नावे आहेत. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व सहकार अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कामाचा ठसा स्पष्ट असून अनेक संस्थांमध्ये त्यांची सक्रिय भूमिका आहे.

त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास सहकारी शिक्षकांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर समाधानकारक मार्ग काढण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande