सोलापूर जिल्ह्यात ॲट्रॉसिटीतून ३६ जणांचा मृत्यू; वारसांसाठी नोकरी प्रक्रिया सुरू
सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खून अथवा अत्याचारामुळे मृत्यू झालेल्याच्या एका वारसाला नोकरी देण्याच्या प्रक्रियेला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने
सोलापूर जिल्ह्यात ॲट्रॉसिटीतून ३६ जणांचा मृत्यू; वारसांसाठी नोकरी प्रक्रिया सुरू


सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खून अथवा अत्याचारामुळे मृत्यू झालेल्याच्या एका वारसाला नोकरी देण्याच्या प्रक्रियेला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) खून अथवा अत्याचाराच्या अनुषंगाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या एका वारसाला नोकरी देण्याचा निर्णय २० नोव्हेंबर २०२५ रोजी घेतला आहे. या निर्णयानुसार दिवंगत व्यक्तीच्या वारसाला गट क व ड संवर्गातील पदावर सरकारी - निमसरकारी नोकरी देण्यात येत आहे. त्यासाठी प्रक्रिया समाजकल्याण विभागाने सुरू केली आहे.जिल्ह्यात ॲट्रॉसिटीतून ३६ जणांचा खून झाला आहे. त्यापैकी चौघांना सरकारी - निमसरकारी नोकरी देण्यात आली आहे. आता उर्वरित ३२ मृतांच्या वारसांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ॲट्रॉसिटीतून मृत्यू झालेल्या चौघांना नोकरी देण्यात आली आहे. खून झालेल्या ३६ पैकी उर्वरित ३२ जणांच्या वारसांसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्या वारसांनी आठ डिसेंबरपूर्वी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सोलापूर आवश्‍यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज करावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande