जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करा - छत्रपती ब्रिगेड
सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयावर सातत्यपूर्ण कडक कारवाई करावी अन्यथा छत्रपती दिवेच्या वतीने गोरगरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलला टाळे ठोकू असा इशारा छत्रपती ब्रिगेडचे वतीने जिल्हाधिकारी यांन
pPp


सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयावर सातत्यपूर्ण कडक कारवाई करावी अन्यथा छत्रपती दिवेच्या वतीने गोरगरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलला टाळे ठोकू असा इशारा छत्रपती ब्रिगेडचे वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

शासनाच्या वतीने सर्वसामान्य गोरगरीब रुग्णावर मोफत उपचार होण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित आहेत पण सोलापुरातील अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू असताना सुद्धा लाभार्थी रुग्णावर मोफत उपचार केले जात नाही.

जेव्हा एक दोन प्रकरण उघडकीस आल्यावर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जाते या कारवाईमध्ये सातत्य नसल्याने सोलापुरातील अनेक रुग्णालय अशा रुग्णांना अजिबात सहकार्य करीत नाहीत. रुग्णांकडून पैसे घेऊन उपचार केली जातात .ग्रामीण भागातील व अशिक्षित अज्ञानी गोरगरीब रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यासाठी टाळाटाळ केली जाते .त्यामुळे शासनाच्या योजनेपासून लाभार्थी असूनही गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचारापासून वंचित ठेवल्यामुळे सामान्य गोरगरीब रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो .औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील एक ही रुग्ण आर्थिक कारणामुळे उपचार मिळाले नाहीत असा राहू नये असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार न करणाऱ्या रुग्णालयांची सातत्याने चौकशी करून अश्या हॉस्पिटलवर आरोग्य मित्र व हॉस्पिटलच्या पॅनलवर असणाऱ्या डॉक्टरां वर कायदेशीर कडक कारवाई सातत्याने होणे आवश्यक आहे तरच शासनाची सर्वसामान्य गोर गरीब लोकांसाठी ही योजना सफल लाभदायक ठरेल.

यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक शाम कदम जिल्हा समन्वयक एडवोकेट विकास तिर्‍हकर शहर अध्यक्ष सीताराम बाबर जिल्हा सचिव दत्तात्रय डिंगणे शहर उपाध्यक्ष सुलेमान पिरजादे शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे शहर संघटक सिद्धार्थ राजगुरू आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande