साेलापुरातील आयटी पार्कच्या विजेसाठी करार अंतिम टप्प्यात
सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे साकारणाऱ्या आयटी पार्कमध्ये उद्योजकांना हिंजवडीच्या (पुणे) तुलनेत जवळपास निम्म्या दराने जागा मिळणार आहे. स्वस्तात जागा दिल्यानंतर आता स्वस्तात वीज देण्यासाठीही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
solor


सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे साकारणाऱ्या आयटी पार्कमध्ये उद्योजकांना हिंजवडीच्या (पुणे) तुलनेत जवळपास निम्म्या दराने जागा मिळणार आहे. स्वस्तात जागा दिल्यानंतर आता स्वस्तात वीज देण्यासाठीही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रयत्नशिल आहेत. एनटीपीसीने उभारलेल्या २३ मेगा वॅटच्या सौर प्रकल्पातून आयटी पार्कसाठी वीज घेतली जाणार आहे. यासाठी एनटीपीसी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात आवश्‍यक असलेला करार सध्या अंतिम टप्प्यात आहे.

महावितरणकडून उद्योजकांना १२ ते १३ रुपये युनिटच्या दरम्यान वीज उपलब्ध करून दिली जात आहे. होटगी आयटी पार्कमधील उद्योजकांना साधारणता ४ ते ५ रुपये युनिट या दरम्यान वीज मिळणार आहे. एनटीपीसी सौर ऊर्जा प्रकल्पातून २३ मेगा वॅट वीजेची निर्मिती करत आहे. यातील १० मेगा वॅट विजेची विक्री झालेली आहे. एनटीपीसीकडे जवळपास १३ मेगा वॅट वीज सध्या शिल्लक आहे. आयटी पार्कला रोज किती विज लागेल, या विजेचा लोड प्रोफाईल कसा असेल, वीजेच्या साठवणुकीसाठी मोठ्या किती बॅटरी लागतील? याचा अंदाज घेतला जात आहे. जिल्हा प्रशासन आणि एनटीपीसी यांच्यात करार झाल्यानंतर होटगी आयटी पार्कमधील उद्योजकांना स्वस्तात वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande