लातूरात महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कृती समितीच्या पाठपुराव्याला यश
लातूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कृती समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व सभोवताली महात्मा बसवेश
महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कृती समितीच्या पाठपुराव्याला यश.


लातूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।

महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कृती समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व सभोवताली महात्मा बसवेश्वर उद्यान विकसित करण्यात येणार असून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. या सुशोभीकरण व उद्यान विकासाचा आराखडा लातूरचे प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री गाडे यानीं काल सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख यांच्याकडे सादर करून अंतिम मंजुरी घेतली पुढील आठवड्यात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या कामासाठी चाळीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे व सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या योगदानाबद्दल आदरणीय दिलीपरावजी देशमुख, बँकेचे अध्यक्ष धीरज भैया देशमुख, उपाध्यक्ष एड प्रमोद जाधव, ज्येष्ठ संचालक अशोक गोविंदपुरकर व सर्व संचालक मंडळाचे महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande