वाढते प्रदुषण रोखण्याकरीता कठोर उपाययोजना करा, खा. फौजिया खान यांची संसदेत मागणी
परभणी, 4 डिसेंबर (हिं.स.)। देशातील वाढत्या वायू आणि जल प्रदुषणाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे संपूर्ण सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात अक्षरशः आणीबाणी सारखी स्थिती आल्याची परिस्थिती उद्भवली आहे. या आपत्कालीन स्थितीत हे प्रदुषण
वाढते प्रदुषण रोखण्याकरीता कठोर उपाययोजना करा : खासदार श्रीमती फौजिया खान यांची राज्यसभेतून मागणी


परभणी, 4 डिसेंबर (हिं.स.)।

देशातील वाढत्या वायू आणि जल प्रदुषणाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे संपूर्ण सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात अक्षरशः आणीबाणी सारखी स्थिती आल्याची परिस्थिती उद्भवली आहे. या आपत्कालीन स्थितीत हे प्रदुषण रोखण्याकरीता केंद्र सरकारने कठोर उपाययोजना अवलंबवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी राज्यसभेत केली.

प्रदुषण हा केवळ पर्यावरणीय मुद्दा नाही, प्रदुषणाने संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच दिवसेंदिवस धोक्यात आणत आहे. आरोग्याच्या क्षेत्रात प्रदुषणाने अक्षरशः आणीबाणीसारखी स्थिती आणली आहे. जीव धोक्यात घालणार्‍या धोक्याच्या मर्यादेपर्यंत प्रदुषणाची पातळी नियमितपणे पोहोचत आहे, असे असतांना आपण उदासिनता सहन करु शकत नाही, असे स्पष्ट करीत श्रीमतीी खान यांनी प्रदुषणाच्या आपत्कालीन स्थितीत त्वरित कठोर उपाययोजनांचा अवलंब व्हावा, त्यासाठी उल्लंघन करणार्‍यांविरुध्द कठोर दंडही आकारले जावेत, असे सूचवुन श्रीमती खान यांनी सरकारने या दृष्टीने जलदगतीने व एकसमानपणे उपाययोजना अवलंबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. पर्यावरणीय नियमांच्या केंद्रस्थानी असलेली प्रदुषण नियंत्रण मंडळे, त्याची विश्‍वासाहर्ता आणि त्यांच्या वैज्ञानिक आदेशांची पूर्तता करण्याची क्षमता कमी असणार्‍या प्रणाली भ्रष्टाचाराने अक्षरशः पोखरल्या आहेत, कमकुवत झाल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

कमकुवत नागरी जाणिवा आणि प्रचंड भ्रष्टाचार यावर प्रखर टीका टिप्पणी करतेवेळी केवळ राष्ट्रगीते गाऊन राष्ट्रभक्ती व्यक्त होऊ शकत नाही, तर व्यवहारात मातृभुमीच्या सर्वार्थाने रक्षणाकरीता नागरीकांनी वर्तने सुधारली पाहिजेत, जबाबदारीने कामे केली पाहिजेत. पर्यावरणाचे पालन केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande