उसनवारीचे डब्बे घेऊन धावणारी वलसाड फास्ट पॅसेंजर; ‘स्वतःचा’ रेक केव्हा मिळणार?
पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)। कामगार वर्गासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली ५९०२३-२४ वलसाड फास्ट पॅसेंजर जवळजवळ वर्षभरापासून उसनवारीच्या डब्यांवर धावत आहे. मूळची डबलडेकर क्षमता असलेली ही लोकप्रिय गाडी ५ जानेवारी २०२५ पासून ICF सिंगल-डेकर डब्यांसह सुरू करण्य
उसनवारीचे डब्बे घेऊन धावणारी वलसाड फास्ट पॅसेंजर; ‘स्वतःचा’ रेक केव्हा मिळणार?


पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)।

कामगार वर्गासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली ५९०२३-२४ वलसाड फास्ट पॅसेंजर जवळजवळ वर्षभरापासून उसनवारीच्या डब्यांवर धावत आहे. मूळची डबलडेकर क्षमता असलेली ही लोकप्रिय गाडी ५ जानेवारी २०२५ पासून ICF सिंगल-डेकर डब्यांसह सुरू करण्यात आली. मात्र, स्वतःचा रेक उपलब्ध नसल्याने ही गाडी सुरु करताना विरार-सुरत शटल, वांद्रे-वापी पेसेंजर, विरार-वलसाड शटल या गाड्यांचे रेक वापरावे लागले. त्याचा थेट परिणाम म्हणून अनेक प्रवासी-प्रिय गाड्यांची वेळावली बिघडली असून त्या गाड्या बाधित झाल्याची नाराजी प्रवाशांमध्ये पाहायला मिळते.

दरम्यान, खालील गाड्यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे—१) ५९०३९ – विरार-वलसाड शटल२) ५९०४५ – वांद्रे-वापी पेसंजर३) ५९०४६ – वलसाड-वांद्रे पेसंजर४) ५९०४० – वापी-विरार शटल

याशिवाय, पूर्वी प्रवाशांना सोयीची पर्याय ठरलेली ५९०४५-४६ वलसाड-वांद्रे पेसंजर रद्द करून त्याऐवजी ०९०५५-५६ उधना–वांद्रे एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस बंद असते, कारण त्या दिवशीच ती सुरत-अमरावती (२०९२५-२६) म्हणून धावत असते. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात.

पुश-पुल प्रणालीमध्ये दोन्ही बाजूंना इंजिन असल्याने, इंजिन बदलण्याची वेळखाऊ प्रक्रिया टळेल, शटल व पेसेंजर गाड्यांचे पूर्ववत संचालन शक्य होईल, तसेच वलसाड फास्ट पॅसेंजरला स्वतःचे ‘अस्तित्व’ प्राप्त होईल,असा त्यांनी भर दिला.

प्रवाशांचे म्हणणे आहे की, डबल डेकरची क्षमता असलेली गाडी मागील वर्षभर साध्या ICF डब्यांमध्ये धावत आहे, हे अत्यंत अन्यायकारक असून रेल्वेने योग्य ते नियोजन करून गाडीला स्वतंत्र, आधुनिक आणि उच्च क्षमतेचा रेक द्यावा.

सध्या प्रवासी व्यवस्थित सुविधा, आरामदायी प्रवास आणि नियमित वेळापत्रकाची आस लावून बसलेले आहेत. रेल्वे प्रशासन यावर सकारात्मक भूमिका घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande