महिन्याभरात पुण्यात २ हजार ९८९ खड्डे बुजविले
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। रस्ते समपातळीत नाहीत, खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत, चुकीच्या पॅचवर्क वाहनचालकांचे कंबरडे मोडले अशी स्थिती असूनही पथ विभागाकडून दुर्लक्ष केले जात होते. पण महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पथ विभागाला १५ क्षेत्रीय कार्य
महिन्याभरात पुण्यात २ हजार ९८९ खड्डे बुजविले


पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)। रस्ते समपातळीत नाहीत, खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत, चुकीच्या पॅचवर्क वाहनचालकांचे कंबरडे मोडले अशी स्थिती असूनही पथ विभागाकडून दुर्लक्ष केले जात होते. पण महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पथ विभागाला १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विशेष खड्डे बुजविणे मोहीम राबविण्यास सांगितले होते. एका महिन्यात २ हजार ९८९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर १ लाख ८९ हजार चौरस मीटर इतके रस्त्यांचे क्षेत्र खरडून काढून तेथे डांबराचा नवा थर देण्यात आला आहे. त्यामुळे या किरकोळ दुरुस्त्यांमुळे रस्ते चांगले झाले आहेत.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सणस क्रीडांगण येथे खड्डे बुजवा मोहिमेचे उद्‍घाटन केले होते. त्यास आज एक महिना झाल्याने पथ विभागाने त्याचा लेखाजोखा मांडला आहे. पुणे शहराच्या जुन्या हद्दीतील २५० चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये ही मोहीम राबविली जात आहे. एका महिन्यात विविध रस्त्यांवरील २ हजार ९८९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. एकाच रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत, ते बुजविणे शक्य नाही अशा ठिकाणी जेसीबीने रस्‍त्यावरील डांबरी खरडून काढून तेथे नव्याने डांबरीकरण केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande