१५०+ बिल्डर्स उपस्थित; क्रेडाई MCHI रायगडचा ‘बीज कनेक्ट’ यशस्वी
रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)। क्रेडाई MCHI रायगड आणि क्रेडाई MCHI युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुर्भे, नवी मुंबई येथील ताज विवांता हॉटेलमध्ये ‘बीज कनेक्ट’ या भव्य उद्योग-नेटवर्किंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रिअल इस्टेट क्षेत्र
क्रेडाई MCHI रायगड आणि क्रेडाई MCHI युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुर्भे, नवी मुंबई येथील ताज विवांता हॉटेलमध्ये ‘बीज कनेक्ट’ या भव्य उद्योग-नेटवर्किंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रिअल इस्टेट क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, आधुनिक उत्पादने आणि बिल्डर्स–सप्लायर्स यांच्यातील थेट संवाद वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.  कार्यक्रमाची सुरुवात क्रेडाई MCHI रायगड युनिटचे अध्यक्ष अरविंद एम. सावळेकर यांच्या स्वागत प्रस्तावाने झाली. त्यांनी बीज कनेक्टचा उद्देश स्पष्ट करताना उद्योगातील व्यावसायिक बंध अधिक मजबूत करण्याची आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. नवी मुंबई आणि रायगड परिसरातील विक्रेते, डेव्हलपर्स आणि उद्योग तज्ज्ञांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  या एक्स्पोमध्ये सुमारे २० प्रतिष्ठित विक्रेत्यांनी विविध बांधकाम साहित्य, तांत्रिक उत्पादने आणि नवीन सोल्यूशन्स सादर केली. कार्यक्रमाचे “Powered By Sponsor” असलेल्या SB Formwork यांनी विशेष प्रेझेंटेशन सादर करून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. संपूर्ण कार्यक्रमात १५० हून अधिक बिल्डर्स, आर्किटेक्ट्स आणि व्यावसायिकांनी B2B चर्चांमध्ये सहभाग नोंदवून संध्याकाळ फलदायी ठरवली.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रेडाई MCHI चे सचिव रुशी मेहता तर मान्यवर पाहुणे CEO केवल वलांभिया होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा सहकार्यवर्धक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करत राहण्याचा सल्ला दिला.  कार्यक्रमाला CREDAI MCHI नवी मुंबई, CREDAI BANM, BANM रायगड, CREDAI ड्रोनागिरी आणि MHBA या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेक्रेटरी राकेश प्रजापती, संयोजक वैभव अग्रवाल, युथ अध्यक्ष जितेश अग्रवाल, सेक्रेटरी अशियान खोत आणि संपूर्ण युथ–रायगड टीमने सक्रिय भूमिका बजावली.  राष्ट्रगीताने सुरुवात झालेला हा कार्यक्रम भव्य डिनरसह यशस्वीरीत्या संपन्न झाला.


रायगड, 5 डिसेंबर (हिं.स.)। क्रेडाई MCHI रायगड आणि क्रेडाई MCHI युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुर्भे, नवी मुंबई येथील ताज विवांता हॉटेलमध्ये ‘बीज कनेक्ट’ या भव्य उद्योग-नेटवर्किंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रिअल इस्टेट क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, आधुनिक उत्पादने आणि बिल्डर्स–सप्लायर्स यांच्यातील थेट संवाद वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात क्रेडाई MCHI रायगड युनिटचे अध्यक्ष अरविंद एम. सावळेकर यांच्या स्वागत प्रस्तावाने झाली. त्यांनी बीज कनेक्टचा उद्देश स्पष्ट करताना उद्योगातील व्यावसायिक बंध अधिक मजबूत करण्याची आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. नवी मुंबई आणि रायगड परिसरातील विक्रेते, डेव्हलपर्स आणि उद्योग तज्ज्ञांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या एक्स्पोमध्ये सुमारे २० प्रतिष्ठित विक्रेत्यांनी विविध बांधकाम साहित्य, तांत्रिक उत्पादने आणि नवीन सोल्यूशन्स सादर केली. कार्यक्रमाचे “Powered By Sponsor” असलेल्या SB Formwork यांनी विशेष प्रेझेंटेशन सादर करून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. संपूर्ण कार्यक्रमात १५० हून अधिक बिल्डर्स, आर्किटेक्ट्स आणि व्यावसायिकांनी B2B चर्चांमध्ये सहभाग नोंदवून संध्याकाळ फलदायी ठरवली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रेडाई MCHI चे सचिव रुशी मेहता तर मान्यवर पाहुणे CEO केवल वलांभिया होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा सहकार्यवर्धक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करत राहण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाला CREDAI MCHI नवी मुंबई, CREDAI BANM, BANM रायगड, CREDAI ड्रोनागिरी आणि MHBA या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेक्रेटरी राकेश प्रजापती, संयोजक वैभव अग्रवाल, युथ अध्यक्ष जितेश अग्रवाल, सेक्रेटरी अशियान खोत आणि संपूर्ण युथ–रायगड टीमने सक्रिय भूमिका बजावली. राष्ट्रगीताने सुरुवात झालेला हा कार्यक्रम भव्य डिनरसह यशस्वीरीत्या संपन्न झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande