आरोग्य–आदिवासी विकासासह तीन विभागांचे 26 अधिकारी मेळघाट दौऱ्यावर
अमरावती, 5 डिसेंबर (हिं.स.)। राज्य शासनाच्या तीन विभागांच्या प्रथान सचिवांसह सहा विभांगाच्या २७अधिकाऱ्यांचा ताफा शुक्रवारी सकाळपासून मेळघाटात दाखल होत आहे. सहा पथकाद्धारे वरिष्ठ अधिकारी विविध सोयी, सुविधांचा आढावा घेऊन फ्रेंडवर्कर कर्मचाऱ्यांशी चर
आरोग्य–आदिवासी विकासासह तीन विभागांचे 26 अधिकारी मेळघाट दौऱ्यावर


अमरावती, 5 डिसेंबर (हिं.स.)।

राज्य शासनाच्या तीन विभागांच्या प्रथान सचिवांसह सहा विभांगाच्या २७अधिकाऱ्यांचा ताफा शुक्रवारी सकाळपासून मेळघाटात दाखल होत आहे. सहा पथकाद्धारे वरिष्ठ अधिकारी विविध सोयी, सुविधांचा आढावा घेऊन फ्रेंडवर्कर कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे. या पथकात आरोग्य, आदिवासी विकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग, वित्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मेळघाटात शासनाच्या योजनांची मुळात अंमलबजावणी होत नाही. तेथे कोट्यावर्धी रुपये खर्च करूनहीसुविधांचा अभाव कायम असल्याची याचिक रविद्र कोल्हे, बंडू साने, राजेंद्र बर्मा व डॉ कूलपे यांनी उच्चन्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशावरुन राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेळघाटात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने मेळघाटातील आदिवासी भागातील आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, महिला व बालविकास आणि इतर मूलभूत सुविधा तपासण्यासाठी राज्यातील विविध विभागांचे प्रधान सचिव, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी शुक्रवार ५ डिसेंबर रोजी मेळघाट दौरयावर येत आहेत. या दौऱ्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. विपून विनायक, आदीवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्य शासनातील प्रमुख 26 अधिकाऱ्यांचा ताफा मेळघाटात दाखल होत आहे. या अधिकाऱ्यांचे सहा पथक तयार करण्यात आले असून सकाळी ९ वाजतापासून एकाचवेळी उच्चस्तरीस अधिकारी मेळघाट दाखल होणार आहे. दिवसभर सदर अधिकारी विविध सोयी, सुविधांचा आढावा घेऊन ग्राऊंड रिपोर्ट तयार करतील. त्यानंतर शनिवारी या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दौऱ्यामुळे स्थानिक अधिकाऱयांची चांगलीच कसरत होणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकारी दाखल होत व असल्याने प्रशासनसह मेळघाटात या दौऱ्याची उत्सुकता लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande