
लातूर, 5 डिसेंबर, (हिं.स.)। बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. या मध्ये ६०० किलो बंदी असलेल्या प्लास्टिकचे ४३ बॉक्स जप्त करून ५ हजार दंड वसुल करण्यात आला.
मानसी मीना यांच्या आदेशावरून तसेच उपायुक्त वसुधा फड स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांतजी पिडगे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलिम शेख, क्षेत्रिय अधिकारी रवि कांबळे यांच्या उपस्थितीत रिंग रोड या भागात बंदी असलेले प्लास्टिक वाहतूक करत असलेल्या एका वाहनावर छापा टाकण्यात आला.
आला. यामध्ये बंदी असलेले एकूण ४३ बाक्सेस अंदाजे ६०० किलो प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. या मोहिमेत मुख्य स्वच्छता निरीक्षक धोंडीराम सोनवणे, शिवराज शिंदे, अक्रम शेख, स्वच्छता निरीक्षक प्रदिप गायकवाड अशिष साठे, महादेव फिस्के व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis