
बीड, 5 डिसेंबर (हिं.स.)।केज तालुक्यातीलकानडी माळी येथे खडी क्रशरवर काम करणाऱ्या झारखंड राज्यातील २५ वर्षीय परप्रांतीय मजुराचा खडी व दगडाची वाहतूक करणाऱ्या हायवाने खदाणीच्या भिंतीलगत चिरडल्याने मृत्यू झाला. मोहम्मद साहिल प्रवाज (वय २५, रा. झारखंड) असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. ३) सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मोहम्मद साहिल प्रवाज हा खदाणीच्या भिंती लगत उभा होता. त्या वेळी खडी व दगडाची वाहतूक करणाऱ्या हायवा (एम एच-२०/इ जी- ४०१२) चालक बाजीराव बापुराव फुंदे (रा. जिवाचीवाडी ता. केज) याने हायवा निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवल्यामुळे मोहम्मद हा खदानीचे कडेला दबल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
--
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis