लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी निवेदन
येवला, 5 डिसेंबर (हिं.स.)। - महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहाद च्या वाढत्या घटना व फसवणू व बळाचा वापरा करून धर्मांतरन रोखण्यासाठी महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा लवकर अमलात आणावा, व पिढीताना संरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसील
लव्ह जिहाद विरोधी कायदा लवकर करावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले


येवला, 5 डिसेंबर (हिं.स.)।

- महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहाद च्या वाढत्या घटना व फसवणू व बळाचा वापरा करून धर्मांतरन रोखण्यासाठी महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा लवकर अमलात आणावा, व पिढीताना संरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार येवला यांना सखल हिंदू जागरण समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

हिवाळी अधिवेशनात 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा' संमत व्हावा, यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.लव्ह जिहाद'विरोधात कायदा करणारे देशामध्ये नऊ राज्यात कायदा पारित झाला असून आता. महाराष्ट्र हे दहावं राज्य ठरणार आहे. लवकरात महाराष्ट्र राज्यात कायदा पारित व्हावा या साठीअनेक महिलांसह सखल हिंदू जागरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती. हा कायदा लवकर पारित होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहसील कार्यालय येथे संघटने कडून निवेदन देण्यात येत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande