रत्नागिरी : आंबा घाटात खासगी बस दरीत कोसळली; सर्व प्रवासी सुखरूप
रत्नागिरी, 5 डिसेंबर, (हिं. स.) | रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात पहाटे ५ वाजता प्रवासी वाहतूक करणारी खासगी प्रवासी व बस दरीत कोसळली. मात्र त्यातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रॅव्हल्स बस (क्रमांक MP 13/P 1371
अपघातग्रस्त प्रवासी बस


रत्नागिरी, 5 डिसेंबर, (हिं. स.) | रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात पहाटे ५ वाजता प्रवासी वाहतूक करणारी खासगी प्रवासी व बस दरीत कोसळली. मात्र त्यातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रॅव्हल्स बस (क्रमांक MP 13/P 1371) सुमारे ७० फूट दरीत कोसळली. या बसमध्ये नेपाळमधील आंबा बागेत काम करणारे गुरखे असल्याची प्राथमिक माहिती असून नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

अपघातानंतर तत्काळ स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती देवरूख पोलीस ठाण्याने दिली.

या घटनेत ११ जखमी प्रवाशांना साखरपा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बस दरीत कशी कोसळली याबाबत तपास सुरू असून नेमके कारण समजू शकलेले नाही.

आंबा घाटातील या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि स्थानिकांच्या तत्काळ मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande