
अकोला, 5 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला जिल्हा गृहरक्षक दलातील होमगार्ड कर्मचाऱ्यांचे नवदुर्गा उत्सवाचे मानधन अद्याप थकित असून त्यामुळे अनेकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. यादरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मानधन वितरित करण्यात आले असताना अकोल्यात मात्र मंजूर रक्कम वारंवार परत पाठवली जात असल्याचा गंभीर आरोप गृहरक्षकांनी केला आहे. आज संतप्त होमगार्ड कर्मचाऱ्यांनी जिल्हा गृहरक्षक कार्यालयात धडक देत अधिकारी वर्गाला जाब विचारला. तर दुसरीकडे मानधन देण्यात होणाऱ्या विलंबाबद्दल ठोस स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली. मानधन तात्काळ मिळाले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही गृहरक्षकांनी दिला असून त्यामुळे आता गृहप्रशासनावर सवाल निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे