अकोल्यात शासकीय ITI समोर शाळकरी मुलीला धडक; शिक्षकांकडून मुख्य मार्गावर गतिरोधकांची मागणी
अकोला, 5 डिसेंबर (हिं.स.)। अकोला शहरातील शिवाजी कॉलेज ते कोतवाली पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आज सकाळी एक धक्कादायक अपघात घडला. महिला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) समोर आयडिया कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीला दुचाकीस्वारा
O


अकोला, 5 डिसेंबर (हिं.स.)।

अकोला शहरातील शिवाजी कॉलेज ते कोतवाली पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आज सकाळी एक धक्कादायक अपघात घडला. महिला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) समोर आयडिया कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरून फरार झाला.

अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली असून, महिला ITIतील उपस्थित शिक्षकांनी तात्काळ मदत करत तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

शिक्षकांनी सांगितले की, या मुख्य मार्गावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. याबाबत अनेक निवेदने प्रशासनाला दिली असूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

लवकरात लवकर या मार्गावर गतिरोधक बसवून मोठे अपघात टाळावेत, अशी जोरदार मागणी महिला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande