रत्नागिरी : लांजा येथे रविवारी रक्तदान शिबिर
रत्नागिरी, 5 डिसेंबर, (हिं. स.) : लांजा येथील शिवगंध प्रतिष्ठानतर्फे ७ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.रविवारी सकाळी ७.३० ते दुपारी १ या वेळेत संकल्प सिद्धी सभागृहात रक्तदान शिबिर होईल. जिल्हा रक्तपेढीतील असणारा रक्ताचा तुटवडा आ
रत्नागिरी : लांजा येथे रविवारी रक्तदान शिबिर


रत्नागिरी, 5 डिसेंबर, (हिं. स.) : लांजा येथील शिवगंध प्रतिष्ठानतर्फे ७ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.रविवारी सकाळी ७.३० ते दुपारी १ या वेळेत संकल्प सिद्धी सभागृहात रक्तदान शिबिर होईल.

जिल्हा रक्तपेढीतील असणारा रक्ताचा तुटवडा आणि रक्ताची वाढती मागणी लक्षात घेता लांजा येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवगंध प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने कुमार अद्वैत प्रकाश जाधव याच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस वसाहत येथील संकल्प सिद्धी सभागृहात हे शिबिर होणार आहे.

शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande