कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातील दरीत बस कोसळली; ५ प्रवासी जखमी
कोल्हापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)। कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरून कोकणात जाणाऱ्या आंबा घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा स्टेअरिंग ताबा सुटल्याने परराज्यातून आलेली एक बस ७० फूट खोल दरीत कोसळली. ही घटना घडली. या बसमध्ये सुमारे १०० प्रवासी होते त्यापैकी
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातील दरीत बस कोसळली; ५ प्रवासी जखमी


कोल्हापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरून कोकणात जाणाऱ्या आंबा घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा स्टेअरिंग ताबा सुटल्याने परराज्यातून आलेली एक बस ७० फूट खोल दरीत कोसळली. ही घटना घडली. या बसमध्ये सुमारे १०० प्रवासी होते त्यापैकी अपघातात ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

संबंधित बस मध्यप्रदेशातील भिंड येथील असल्याचे समोर आले आहे.

या अपघाताची अधिक माहिती अशी की आंबा घाटातील चक्री वळणाजवळ बसचालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. मात्र दरीत खाली जात असताना बस एका मोठ्या झाडावर तटली. आणि पूर्ण खोल दरीत जाण्यापासून थांबली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.

ही घटना रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या हद्दीत घडली असून पोलिस पथक, स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande