‘उमीद’ पोर्टलवरील वक्फ मालमत्तांच्या नोंदणी मुदत वाढवा, मराठवाड्यातील काँग्रेसच्या खासदारांची मागणी
छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)। मराठवाड्यातील काँग्रेसच्या खासदारांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय अल्पसंख्यक कार्य मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेऊन ‘उमीद’ पोर्टलवरील वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसंदर्भातील अंतिम मुदत वाढविण्याबाबत निवेदन सादर
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)।

मराठवाड्यातील काँग्रेसच्या खासदारांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय अल्पसंख्यक कार्य मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेऊन ‘उमीद’ पोर्टलवरील वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसंदर्भातील अंतिम मुदत वाढविण्याबाबत निवेदन सादर केले. काँग्रेसच्या शिष्टमंडळात खासदार डॉ. कल्याण काळे खासदार शिवाजीराव काळगे खासदार रवींद्र चव्हाण हे मराठवाड्यातील खासदार उपस्थित होते

गेल्या अनेक दिवसांपासून ‘उमीद’ पोर्टलवर सतत सर्व्हर डाउन, अपलोड एरर व सिस्टिम क्रॅश अशा गंभीर तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वक्फ मालमत्तांच्या नोंदणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.

सध्याची वस्तुस्थिती :

देशभरात आतापर्यंत केवळ 45,116 मालमत्ताच अपलोड झालेल्या आहेत

मोठ्या प्रमाणात नोंदी मेकर–चेकर–अप्रूवर स्तरावर अडकलेल्या आहेत

पंजाब, हरियाणा, दिल्ली व महाराष्ट्रात हजारो नोंदी प्रलंबित आहेत

पोर्टल रात्री काही काळ सुरू राहते व लगेचच क्रॅश होतेया गंभीर परिस्थितीत 05 डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण नोंदणी पूर्ण करणे अशक्य असल्यामुळे, अंतिम मुदत तातडीने वाढविण्याची ठाम मागणी मंत्र्यांकडे केली आहे.

केंद्र सरकारने या तांत्रिक अडचणींचा विचार करून वक्फ संस्था व संबंधित घटकांना दिलासा देणारा न्याय्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. यावेळी उपस्थित खा रवींद्र चव्हाण खा शिवाजीराव काळगे खा बळवंत भाऊ वानखेडे उपस्थित होते

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande