निलंगा नगर परिषद निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवाराने घेतली अमित देशमुख यांची भेट
लातूर, 5 डिसेंबर (हिं.स.)। नगरपरिषदेची निवडणूक स्थगित झालेल्या, निलंगा नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. हमीद शेख, पॅनल प्रमुख श्री अजित नाईकवाडे, नगरसेवक पदाचे उमेदवार व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा काँग्रेसचे अध्यक्
अमित देशमुख


लातूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।

नगरपरिषदेची निवडणूक स्थगित झालेल्या, निलंगा नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. हमीद शेख, पॅनल प्रमुख श्री अजित नाईकवाडे, नगरसेवक पदाचे उमेदवार व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री अभय साळुंके यांनी आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी जाऊन राज्याचे माजी मंत्री विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित देशमुख यांची भेट घेतली. आगामी काळात राबवायचा प्रचार यंत्रणेसंदर्भात यावेळी चर्चा झाली.

काही तासावर मतदान आलेला असताना २ डिसेंबर रोजी होणारी निलंगा नगर परिषदेची निवडणूक, निवडणूक आयोगाने स्थगित करून ती २० डिसेंबर रोजी होईल असे जाहीर केले. जनमत विरोधात असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यातील सत्ताधारी मंडळींनी निवडणूक आयोगाला सांगून ही निवडणूक स्थगित करायला लावली अशी धारणा निलंगा शहरातील जनतेची बनली आहे. त्यामुळे जनतेतून सत्ताधाऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त होत आहे. या परिस्थितीत जनतेचा हा रोष २० डिसेंबर रोजी मतपेटीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान भैय्या साहेबांनी केले आहे.

या शिष्टमंडळात निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, डॉ. अरविंद भातंबरे, अजित माने, पंकज शेळके, लाला पटेल, प्रा.गजेंद्र तरंगे, अजित निंबाळकर, अंबादास जाधव, सुधाकर पाटील, धनाजी चांदुरे, सिराज देशमुख, ऍड. प्रवीण भोसले, चक्रधर शेळके, शकील पटेल आदिसह निलंगा तालुका व शहर काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande