छ. संभाजीनगरात पोलिस भरती अर्जास रविवारपर्यंत मुदतवाढ
छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)। पोलीस भरतीसाठी युवक-युवतींना अर्ज करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जासाठी मुदतवाढ देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या नगरपालिका, नगर परिषदां
छ. संभाजीनगरात पोलिस भरती अर्जास रविवारपर्यंत मुदतवाढ


छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)।

पोलीस भरतीसाठी युवक-युवतींना अर्ज करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जासाठी मुदतवाढ देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकीमुळे पोलिस दल बंदोबस्तात आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐन निवडणुकांच्या धामधुमीत शासनातर्फे पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात १५ हजार ६३१ पोलिसांची भरती सुरू आहे. त्यात पोलिस शिपाई, चालक शिपाई, बँड्समन, सशस्त्र पोलिस, कारागृह शिपाई अशी पदे आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अडीचशेहून अधिक पदांसाठी पोलिसांची भरती होणार आहे

भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. ८ डिसेंबरनंतर अर्जाची छाननी होईल. पात्र उमेदवारांची फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी सुरू होईल. तरुण-तरुणींना अर्ज करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह अर्ज जमा करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत संधी असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande