
नंदुरबार, 5 डिसेंबर (हिं.स.) नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.राज्यात नगरपालिका निवडणुका पार पडल्या असून यांवर आता लवकरच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत. अशा निवडणुकीच्या वातावरणात नंदुरबारात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अधिकृतपणे पाठवला आहे.या राजीनाम्यात त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं नमूद केलं. त्यांची राजीनाम्याची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वीच नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक संघटनांमध्ये या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली असून, येणाऱ्या निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल, याबाबच राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर