
सोलापूर, 5 डिसेंबर (हिं.स.)।स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी करणाऱ्यांचे राजकीय डावपेच मोडून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या कमळ चिन्ह्यावर उमेदवार उभे करण्यात यशस्वी ठरल्याचा दावा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केला. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी वार्तालाप करत होते.यावेळी राज्य प्रतिनिधी राजेंद्र सुरवसे, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, सुदर्शन यादव,अंकुश आवताडे,शंकर वाघमारे, सुशांत हजारे, सुशील क्षिरसागर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, नगरपालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यामध्ये नगरपालिका निवडणुका या पक्ष चिन्हा ऐवजी आघाडीच्या चिन्हावर लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना आदी राष्ट्र नंतर पक्ष या धोरणातून निवडणूक जाहीर होण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाणार असल्याचा संकेत यापूर्वी दिले होते. त्यामुळे ही निवडणूक पक्ष चिन्हावर लढवण्यासाठी आपण आग्रही होतो.तर काही नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला एक दोन जागा देण्याचा प्रयत्न केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड