रत्नागिरी : नवोदय विद्यालय प्रवेशासाठी १३ डिसेंबरला परीक्षा
रत्नागिरी, 5 डिसेंबर, (हिं. स.) : नवोदय विद्यालयाच्या सहावीतील प्रवेशाची परीक्षा येत्या 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये परीक्षा होणार आहे. प्रत्येक तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत परीक
रत्नागिरी : नवोदय विद्यालय प्रवेशासाठी १३ डिसेंबरला परीक्षा


रत्नागिरी, 5 डिसेंबर, (हिं. स.) : नवोदय विद्यालयाच्या सहावीतील प्रवेशाची परीक्षा येत्या 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये परीक्षा होणार आहे.

प्रत्येक तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत परीक्षा होणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता आपली उपस्थिती नोंदवावी. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. बसवराज यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande